
Mumbai : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. त्यानंतर मुंबईकरांनी या मार्गाला भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला. ३१ मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकिटाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल झाले. तसेच येत्या आठवडाभराच्या कालावधीसाठीही नागरिकांनी आगाऊ तिकिट नोंदणी केली आहे. अवघ्या दोन दिवसात तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी निसर्ग उद्यान मार्गाला भेट दिली.
सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. या मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी पार पडल्यानंतर मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पहिल्या दिवशी म्हणजेच ३० मार्च रोजी १ हजार ५३ मुंबईकरांनी या मार्गाला भेट दिली. या तिकिट नोंदणीतून महापालिकेच्या तिजोरीत २६ हजार ९२५ रुपये इतका महसूल जमा झाला. तर ३१ मार्च रोजी २ हजार ३४६ पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. यातून ६० हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच आठवड्याच्या अखेरसाठीही मोठ्या प्रमाणात आगाऊ तिकिट नोंदणी होत आहे.
|
Pune : वेताळ टेकडी फोडल्यास शहरातील भूजल धोक्यात? जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांचे मत |
शेकडो झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. या ठिकाणी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी न्याहाळताना एका ठिकाणावरून गिरगांव चौपटीेचेही विहंगम दृश्य पाहण्याचीही संधी पर्यटकांना मिळत आहे. तसेच, पर्यटकांना पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश
निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी-सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे या ठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याच्याही सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
ऑनलाईन तिकिट नोंदणीची सुविधा
निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचा कालावधी (स्लॉट) आहे. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीतून प्राप्त झालेल्या बारकोडच्या सहाय्यानेच पर्यटकांना या मार्गावर प्रवेश मिळणार आहे
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



