MS Dhoni: 'सामना हरलोय असं वाटलंच नाही...!', CSKच्या पराभवानंतर धोनीच्या पत्नीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

MS Dhoni Wife Sakshi Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (31 मार्च) चेन्नई सुपर किंग्स संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 धावांनी पराभवाचा धक्का बसला. हा चेन्नईचा या हंगामातील पहिलाच पराभव आहे.

दरम्यान असे असले तरी या सामन्यातून चाहत्यांना चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीची आक्रमक फलंदाजी पुन्हा पाहायला मिळाली. त्यामुळे विशाखापट्टणमच्या मैदानावर प्रेक्षकांकडून धोनीला आणि चेन्नई सुपर किंग्सला मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाहायला मिळाला.

धोनी फलंदाजीला आल्यापासून मैदानात मोठ्या प्रमाणात आवाज होता. त्याचमुळे चेन्नईच्या पराभवाबरोबर या सामन्यात धोनीने केलेल्या फलंदाजीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याचदरम्यान धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीवर केलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरला.

MI : वानखेडेवर मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक ? सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघाचीही प्रतिष्ठा पणास

साक्षीने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचेही पुनरागमानाबद्दल आनंद व्यक्त करताना धोनीचेही कौतुक केले. पंतचा 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 14 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

परंतु, त्याने त्या अपघातानंतर आता पूर्ण तंदुरुस्ती मिळवून 14 महिन्यांनी आयपीएल 2024 मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने पुनरागमनानंतर चेन्नईविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात पहिले अर्धशतकही ठोकले. त्याने 32 चेंडूत 51 धावांची खेळी करत दिल्लीला 20 षटकात 5 बाद 191 धावांपर्यंत पोहचवण्याच मोलाचा वाटा उचलला.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून धोनी आठव्या क्रमांकावर १७ व्या षटकात फलंदाजीला उतरला होता. त्याने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या.

तसेच रविंद्र जडेजाबरोबर 7 व्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारीही केली. परंतु, त्याची ही आक्रमक खेळी चेन्नईला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. मात्र चेन्नईला मोठ्या पराभवापासून त्याने दूर ठेवले.

या सामन्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीला धोनीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याला इलेक्ट्रिक स्ट्रायकरचा पुरस्कार मिळालेला दिसत आहे.

तसेच तिने या पोस्टवर लिहिले की 'सर्वात पहिल्यांदा ऋषभ पंत तुझे पुन्हा एकदा स्वागत. माही आपण सामना हरलोय असं जाणवलंच नाही.' दरम्यान, साक्षीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून पंतव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नरनेही 35 चेंडूत 52 धावांची खेळी खेळी केली, तसेच पृथ्वी शॉ याने 43 धावांची खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून धोनीव्यतिरिक्त अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याचबरोबर डॅरिल मिचेलने 34 धावांची खेळी केली, तर जडेजाने नाबाद 21 धावा केल्या.

मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. त्यामुळे चेन्नईला 20 षटकात 6 बाद 171 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 3 विकेट्से घेतल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply