
अकोला : राज्यात महिलांवर अत्याचाऱ्याच्या होणाऱ्या घटना काही थांबताना दिसत नाहीये. अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड ड्रिंकमधून दारु पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करुन घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक त्यांच्याच ओळखीतला युवक भेटला. यावेळी "तुम्हा दोघींना घरी सोडून देतो असं म्हणून त्याने दोघींनाही गाडीवर बसवलं. त्यानंतर तो या दोघींना सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पवन वाटिकेत घेऊन गेला.
इथे आल्यावर त्याने चॉकलेट आणि थम्सअप नावाचं कोल्ड ड्रिंक दोघांनाही प्यायला दिलं. यावेळी त्या दोघींनी कोल्ड ड्रिंक प्यायलं आणि चॉकलेटही खाल्लं. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर दोघींनाही गुंगी यायला लागली. याचा फायदा घेत तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला आणि दोघींसोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
त्याचवेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केले. या संपूर्ण घटनेत चार जणांचा सहभाग असल्याचे समजते. तर यातील दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर अन्य दोघांनी त्यांना याबाबत सहकार्य केले असल्याचे कळते.
काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला, म्हणजेच रात्रीचा एक वाजला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर मुलींच्या पालकांना धक्काच बसला.
दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी तात्काळ सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं असून याबाबत तपास सुरू आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




