नवी दिल्ली/राजस्थान: अचूक जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर परिस्थिती बदलता येते, हे राजस्थानमधील एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील 'पठाणवाला' या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या इंद्रजीत याने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या 'आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' (JEE Advanced 2026) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंद्रजीतने या परीक्षेत OBC-NCL श्रेणीत १०४० आणि देशात (CRL) ४८६१ वा रँक मिळवला असून, तो आपल्या गावातून आयआयटीसाठी पात्र ठरणारा पहिलाच विद्यार्थी बनला आहे.
गावात सुविधांची वाणवा, परीक्षेबद्दलही माहिती नव्हती
इंद्रजीत ज्या पठाणवाला गावात राहतो, तिथे पाणी, आरोग्य किंवा सांडपाण्याची साधी चांगली व्यवस्थाही उपलब्ध नाही. अशा दुर्गम भागात राहणाऱ्या इंद्रजीतला इयत्ता ९ वी पर्यंत जेईई किंवा नीट (NEET) सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांबद्दल काहीही माहिती नव्हती. १० वी मध्ये गेल्यावर त्याने काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून या परीक्षेबद्दल ऐकले. त्यानंतर घरी येऊन गुगलवर 'जेईई म्हणजे काय?' आणि 'आयआयटी काय असते?' याचा शोध घेतला आणि तिथूनच त्याचा हा प्रवास सुरू झाला.
लाखो रुपयांची फी भरण्याची ऐपत नव्हती
इंद्रजीतचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ई-रिक्षा चालवतात. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे कोटा किंवा सिकार सारख्या मोठ्या शहरांत जाऊन लाखो रुपयांची फी भरून कोचिंग घेणे इंद्रजीतसाठी अशक्य होते. आधी त्याने हा विचार सोडून दिला होता, पण नंतर त्याला 'फिजिक्सवाला' (PhysicsWallah) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या कोर्सबद्दल समजले. त्याची फी इतर कोचिंग संस्थांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने त्याने कसाबसा पालकांना तयार केले.
मोबाईल डेटा आणि वीज टंचाईवर काढला तोडगा
ऑनलाईन अभ्यासासाठी इंद्रजीतकडे स्मार्टफोन होता, मात्र घरात वारंवार वीज जाणे आणि इंटरनेटचा डेटा प्लॅन पुरेसा नसणे अशा अडचणी येऊ लागल्या. यावर त्याच्या वडिलांनी त्याला शेजारच्या गावातील स्थानिक सरकारी वाचनालयात (Library) जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्या ग्रंथालयात मोफत इंटरनेट, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची आणि विजेची चांगली सोय होती. मग ते ग्रंथालयच इंद्रजीतचे दुसरे घर बनले.
असा होता रोजचा दिनक्रम
इंद्रजीतने २०२५ मध्ये पहिल्यांदा ही परीक्षा दिली होती, तेव्हा त्याला सुमारे २७,००० रँक मिळाला होता. पण आपण यापेक्षा चांगले करू शकतो या विश्वासाने त्याने एक वर्ष ड्रॉप घेतला. तो रोज सकाळी ६ वाजता अभ्यासाला बसायचा. सकाळी ८ वाजता ग्रंथालयात जाऊन आदल्या दिवशीचा अभ्यास दुरुस्त करायचा आणि दिवसभर ऑनलाईन क्लासेस अटेंड करून तिन्ही विषयांचा कसून अभ्यास करायचा. सोशल मीडिया आणि इतर मनोरंजनापासून दूर राहून त्याने हे यश खेचून आणले आहे.
भविष्यातील स्वप्न
इंद्रजीतला भविष्यात आयआयटी रुड़की (IIT Roorkee) मधून बी.टेक करायचे असून संगणक क्षेत्रात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) आणि 'मशीन लर्निंग' (ML) वर लक्ष केंद्रित करायचे आहे. निकाल समजताच आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू पाहून आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्याने व्यक्त केली
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




