
MP Girish Bapat Health updates : माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे (Pune) भाजपचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरीश बापट हे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बापट यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.
दरम्यान, गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये गिरिश बापट यांच्यावर सध्या आय.सी.यु मध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. गिरीश बापट हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, बापट यांच्या प्रकतीबाबतचे पुढील अपडेट दुपारी देण्यात येणार आहेत.
गिरीश बापटांनी आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंना एकत्र केलं होतं आमंत्रित
काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्या निमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ झालं बापट हे राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आजारी असतानाही प्रचारात सक्रिय
भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात खासदार गिरीश बापट सक्रिय झाले होते. खासदार बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरी वाड्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच गिरीश बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट दोघेही भावूक झाले होते. कसब्यातील विजयानंतर मी तुम्हाला पेढा भरवायला येईन, असा शब्दही गिरीश बापट यांनी दिला होता. गिरीश बापट यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले होते.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




