Malicious WhatsApp Web Malware Campaign Targets Users; Don’t Open These Files!

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा: वेब आणि डेस्कटॉपवर मालवेअरचा हल्ला, चुकूनही 'या' फाईल्स उघडू नका!

Malicious WhatsApp Web Malware Campaign Targets Users; Don’t Open These Files!
व्हॉट्सॲप वेब (WhatsApp Web) आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांना सध्या एका मोठ्या सायबर फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. हॅकर्स व्हॉट्सॲपच्या माध्यमातून 'व्हिज्युअल बेसिक स्क्रिप्ट' (.vbs) फाईल्स पाठवून लोकांचे संगणक हॅक करत आहेत.

धोका काय आहे?
सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपवर बिझनेस किंवा फायनान्शिअल डॉक्युमेंट्स असल्याचे भासवून फाईल्स पाठवत आहेत. या फाईल्सची नावे 'Financial Reports.vbs', 'Account Statement.vbs', किंवा 'Debt confirmation.vbs' अशा प्रकारची असतात. जर तुम्ही या फाईल्सवर क्लिक केले, तर तुमच्या संगणकावर एक 'रिमोट ॲक्सेस ट्रोजन' (RAT) इन्स्टॉल होतो. यामुळे हॅकर्स तुमच्या संगणकाचा पूर्ण ताबा मिळवू शकतात.

या फाईल्सपासून कसे सावध राहावे?
१. अनोळखी फाईल्स उघडू नका: जरी ती फाईल तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आली असेल, तरीही .vbs, .exe, .bat किंवा .msi अशा संशयास्पद फॉरमॅटमधील फाईल्स उघडू नका.
२. हॅकर्सची युक्ती: हॅकर्स अनेकांच्या व्हॉट्सॲप अकाउंट्सचा ताबा मिळवून त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये हे मालवेअर पसरवत आहेत. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने पाठवलेली फाईल असली तरी खात्री केल्याशिवाय ती डाऊनलोड करू नका.
३. डेटा चोरी: एकदा का हा मालवेअर तुमच्या सिस्टिममध्ये आला की, हॅकर्स तुमच्या स्क्रीनवरील सर्व हालचाली पाहू शकतात, ज्यामुळे तुमचे बँक पासवर्ड्स, ओटीपी (OTP) आणि खासगी माहिती धोक्यात येऊ शकते.

 

 

सुरक्षेसाठी काय करावे?

जर तुम्ही चुकून अशी फाईल उघडली असेल, तर तातडीने तुमचा इंटरनेट कनेक्शन बंद करा.

तुमच्या सर्व महत्त्वाच्या अकाउंट्सचे पासवर्ड्स दुसऱ्या सुरक्षित डिव्हाइसवरून त्वरित बदला.

अँटी-व्हायरस स्कॅन करण्याऐवजी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घ्या, कारण हा मालवेअर अनेकदा अँटी-व्हायरसला चकवा देतो.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *