हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. २०२६ मध्ये महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. शास्त्रानुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री साजरी करणे सर्वात शुभ ठरेल. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
१५ फेब्रुवारीलाच महाशिवरात्री का?
पंचांगानुसार, चतुर्दशी तिथीची सुरुवात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०४ वाजता सुरु होत आहे. या तिथीची समाप्ती १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३४ वाजता होणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निशीथ काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा योग १५ फेब्रुवारीच्या रात्री आहे. त्या शास्त्रानुसार याच दिवशी महाशिवरात्री व्रत आणि पूजा करणे फलदायी मानले जातं आहे.
पूजेचे चार प्रहर आणि अचूक वेळ
महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहारांत महादेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक प्रहरात विशिष्ट वस्तूचा अभिषेक केला जातो.
- प्रथम प्रहर: सायंकाळी ६:१५ ते रात्री ९:२५ (दुधाचा अभिषेक)
- द्वितीय प्रहर: रात्री ९:२५ ते मध्यरात्री १२:३५ (दह्याचा अभिषेक)
- तृतीय प्रहर: मध्यरात्री १२:३५ ते पहाटे ३:४५ (तुपाचा अभिषेक)
- चतुर्थ प्रहर: पहाटे ३:४५ ते सकाळी ६:५५ (मधाचा अभिषेक)
- विशेष निशीथ काळ मुहूर्त: १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२:०९ ते १:०० या वेळेत केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते.
महाशिवरात्रीची पूजा कशी कराल?
- महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा.
- त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा.
- दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे.
- शिवाला प्रिय असलेले बेलपत्र, धतुरा, पांढरी मंदारची फुले, भस्म आणि अक्षता अर्पण कराव्यात.
- पूजा करताना ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘महामृत्युंजय मंत्राचा’ मनोभावे जप करावा.
- शेवटी शंकराची आरती करून पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा.
आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. याच दिवशी शिवाने वैराग्य सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिवपुराणानुसार, याच रात्री महादेव पहिल्यांदा लिंगोद्भव रूपात (अग्नीस्तंभ किंवा ज्योतिर्लिंग) प्रकट झाले होते.
असे मानले जाते की, या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते. या दिवशी केलेले ध्यान, जप आणि जागरण इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने जास्त फळ देते. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाचे रक्षण केले, तो दिवसही हाच मानला जातो. काशी विश्वनाथ, उज्जैनचे महाकाल आणि सर्व शिवालयांमध्ये या दिवशी शिव तांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविकांमध्ये चैतन्य निर्माण करतो.
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




