पुणे: लोहगाव-हरणतळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री एका घराच्या आवारात घुसून बिबट्याने पाळीव श्वानाची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी सुरू करत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
माहितीनुसार, हरणतळे परिसरात राहणारे यमराज अशोक खांदवे यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये पहाटे सुमारे दोनच्या सुमारास बिबट्याने पाच फूट उंच भिंतीवरून उडी मारत प्रवेश केला. घराच्या आवारातील पाळीव श्वानावर झडप घालत त्याला जबड्यात पकडून तो पुन्हा भिंतीवरून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वान दिसत नसल्याने कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा थरारक प्रकार उघड झाला.
घटनेनंतर घरापासून काहीशे मीटर अंतरावर श्वानाचा मृतदेह आढळून आला. लोकवस्तीच्या अगदी जवळ बिबट्याने वावर केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार बापूसाहेब पठारे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने असल्याच्या तक्रारी येत असतानाही यापूर्वी ठोस पुरावा नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्याचे निर्देश देण्यात आले.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेत योग्य ठिकाणी पिंजरा उभारण्याची तयारी सुरू आहे. तसेच बिबट्या पकडला जाईपर्यंत नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
"आमचा पाळीव कुत्रा दिसत नसल्याने आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी बिबट्याने घरात घुसून श्वानाला उचलून नेल्याचे दिसले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यमराज अशोक खांदवे, रहिवासी, हरणतळे, लोहगाव'
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




