
Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महापालिका निवडणुकांच्या पूर्वीच दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून नुकतंच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका आणि यंदाच्या बीएमसी निवडणूक भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. घोसाळकरांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच प्रत्येकी दीड हजार असे एकूण ३००० रुपये येत्या १४ जानेवारीपूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.
|
Pune : पुण्यातील 20 उमेदवारांची यादी पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांसमोर सादर, प्रशासन अलर्ट! कारण काय? |
तेजस्वी घोसाळकर यांची इन्स्टा पोस्ट काय?
"सण उत्साहाचा, क्षण मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये, १४ जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत!" असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.
"सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम 'देवाभाऊ' आणि महायुती सरकारने केले आहे." असेही घोसाळकर यांनी लिहिले आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर या दहिसर वॉर्ड क्रमांक २ येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महायुतीच्या उमेदवार आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेवर शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त
दुसरीकडे, पुणे महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात स्वबळावर उतरलेल्या शिवसेनेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही कल्याणकारी योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शिवसेना उमेदवारांचे संपूर्ण पॅनेल असलेल्या पंधरा प्रभागांमध्ये आठ महिला संघटक लाभार्थी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत. अशा दीडशेहून अधिक संवाद कार्यक्रमांमधून सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना प्रत्येक घराघरात पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
शिवसेनेचे ११९ उमेदवार पुणे महापालिका निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या ६३ महिला आणि ५५ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महापालिकेच्या ४१ पैकी पंधरा प्रभागांमध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षासह सर्व पक्षीय उमेदवारांविरोधात शड्डू ठोकले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी सेनेने आक्रमक रणनीती आखली असून, लाडक्या बहिणींच्या पाठबळावर पुणे महापालिकेत भगवा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे.
विधानसभा आणि नगरपालिका-नगर परिषदांच्या निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे ओळखून शिवसेनेने ‘लाडकी बहीण’ योजनेवर प्रचाराची भिस्त ठेवली आहे. ‘शहरातील सर्व प्रभागांमध्ये आठ महिला संघटिका छोट्या-छोट्या गटांमध्ये लाभार्थी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत,’ असे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Mumbai : महापालिका निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ला 3000 रुपये; देवेंद्र फडणवीसांचे गिफ्ट असल्याचा दावा, तेजस्वी घोसाळकरांची घोषणा”