
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals IPL 2024 : मागील पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला आज (ता. २९) होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत कोलकता नाईट रायडर्सशी सामना करावयाचा आहे. घरच्या मैदानावर ही लढत असली तरी मागील पाचपैकी तीन लढतींमध्ये कोलकत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सध्याचा फॉर्म बघता दिल्लीचे पारडे जड म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याच्याऐवजी दिल्लीच्या संघात जेक फ्रेसर मॅकगर्क याची निवड करण्यात आली. याचा फायदा दिल्ली संघाला झाला आहे. मॅकगर्क याने पाच सामन्यांमधून तीन अर्धशतकांसह २४७ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने २३७.५०च्या स्ट्राईकरेटने धावा फटकावल्या आहेत.
या युवा फलंदाजाने मुंबईविरुद्धच्या लढतीत २७ चेंडूंमध्ये ८४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या लढतीत त्याने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवरही आक्रमण केले. दिल्लीने या लढतीत मुंबईवर दहा धावांनी विजय संपादन केला. आता त्यांना कोलकतामधील ईडन गार्डन स्टेडियमवर लढत खेळावयाची आहे. या स्टेडियमवर झालेल्या पंजाब- कोलकतामधील मागील लढतीत ५२३ धावांची फटकेबाजी करण्यात आली होती.
|
Ruturaj Gaikwad CSK Vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला! |
या लढतीत ४२ विक्रमी षटकारही मारण्यात आले. पंजाबने सर्वाधिक २६२ धावांचा यशस्वी पाठलागही केला. याच पार्श्वभूमीवर दिल्ली- कोलकता यांच्यामधील लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोलकता संघातील गोलंदाजांसमोर मॅकगर्कला रोखण्याचे आव्हान असणार आहे.
जेक मॅकगर्कचा दिल्लीच्या संघात प्रवेश झाल्यापासून संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे; पण या संघातील इतर फलंदाजही चमक दाखवत आहेत. रिषभ पंत (३७१ धावा), ट्रिस्टन स्टब्स (२७३ धावा), अभिषेक पोरेल (१८४ धावा) यांनीही महत्त्वाच्या क्षणी धावा उभारल्या आहेत. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव (१२ विकेट), अक्षर पटेल (७ विकेट) या दोन फिरकीवीरांनी दिल्ली संघासाठी छान प्रदर्शन केले आहे.
मुकेशकुमार (१३ विकेट) व खलील अहमद (१२ विकेट) यांनी प्रतिस्पर्धी फलंदाज बाद केले असले तरी त्यांच्या गोलंदाजीवर अनुक्रमे ११.०५ व ९.४८च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. दोघांनाही धावांवर नियंत्रण राखावे लागणार आहे.
सुनील नारायणचा ‘वन मॅन शो’
कोलकता संघाने आतापर्यंत झालेल्या आठपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात त्यांच्यासाठी सुनील नारायण याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३५७ धावा फटकावल्या आहेत. तसेच १८४.०२च्या स्ट्राईकरेटने नारायणने फटकेबाजी केली आहे. गोलंदाजीतही त्याने ठसा उमटवला आहे. ६.९६च्या इकॉनॉमी रेटने धावा देताना त्याने १० फलंदाजही बाद केले आहेत. कोलकता संघ त्याच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
इतर विभागांत सुधारणा हवी
कोलकता संघाने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून चमकदार खेळ दाखवला असला तरी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आपला खेळ आणखीन उंचावण्याची गरज आहे. सुनील नारायण व फिल सॉल्ट हे सातत्याने छान फलंदाजी करीत आहे; पण श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अंगक्रीश रघुवंशी, रिंकू सिंग यांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. आंद्रे रसेलच्या अष्टपैलू कामगिरीवरही कोलकता संघ अवलंबून आहे. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा यांनी गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. कोलकत्याच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणातही चुका घडून आल्या आहेत. यामध्येही कामगिरी उंचवावी लागणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




