
India vs Bangladesh :आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या आगामी 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडिया सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाचा विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारत विरुद्ध बांगलादेश ( सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम वर होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची चिंता मात्र वाढली आहे. बांगलादेशचा दुखापतग्रस्त खेळाडू फिट झाला आहे.
बांगलादेशच्या स्टार खेळाडूबाबत मोठी अपडेट
बांगलादेशचा दुखापतग्रस्त स्टार खेळाडू तंदुरुस्त झाला आहे. हा खेळाडू भारत-बांगलादेश सामन्यात मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शकिब अल हसन आता तंदुरुस्त झाला आहे. शकिब नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान शाकिब अल हसनला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. आता बांगलादेश सामन्याआधी शाकिब फिट झाल्याने तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
|
|
भारताची विजयाची हॅटट्रिक
विश्वचषक 2023 मध्ये भारताची वाटचाल विजयी झाली आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांत विजय मिळवत स्पर्धेत वर्चस्व राखलं आहे. विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेशला आतापर्यंतच्या तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत बांगलादेश सातव्या स्थानावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबरला पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल. त्यानंतर 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
टीम इंडियाची चिंता वाढली!
विश्वचषक 2023 सध्या आणखी रोमांचक होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसामध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या गुणतालिकेत सर्वात खालच्या दोन संघांनी मोठे स्पर्धक इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. फगाणिस्तान आणि नेदरलँड्सने दणदणीत विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेला नवं वळण दिलं आहे. यामुळे टीम इंडियालाही गाफिल राहणं परवडणारं नाही.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




