कोल्हापूर: कळंबा रिंगरोडजवळील सुर्वेनगरातील रणवरे कॉलनीत मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बंद बंगल्यात अज्ञातांनी जिलेटीनसदृश्य कांड्याचे आठ स्फोट घडवून आणल्याची घटना घडली. लागोपाठ झालेल्या या स्फोटात बंगल्यातील चार भिंती पूर्णपणे कोसळल्या असून बंगल्याशेजारील चार घरांचे मोठे नुकसान झाले आहे.दोन कुटुंबात बंगल्यावरुन असलेल्या वादातून हा स्फोट घडवला गेला असण्याची चर्चा असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की घराच्या मागील बाजूच्या दोन बेडरूमसह तीन भिंती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रशस्त बंगला शशिकला वासुदेव बोळींजकर यांच्या मालकीचा असून एप्रिलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चत दोन कुटुंबात बंगल्यावरुन न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे सध्या या बंगल्यात कोणीच राहत नव्हते. मंगळवारी सायंकाळी अचानक या बंगल्यात सलग आठ स्फोट झाले. या स्फोटाचा आवाज जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे बंगल्याच्या पाठीमागील दोन खोल्यांच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. तर अस्मिता बुरळे, जगन्नाथ पाटील, आर. डी. कुंभार आणि जिरगे यांच्या घरांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच करवीर, जुना राजवाडा पोलिस, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत स्फोटातील संशयितांचा शोध सुरू होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरात जिलेटीनला लावण्यात येणाऱ्या दोन वायरी सापडल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
दुपारी खिळे ठोकल्याचे आवाज...
दुपारी दोनच्या दरम्यान या बंगल्यातून तीन तरुण तोंडाला मास्क लावून बाहेर पडताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्याद्वारे शोधमोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान, याच बंगल्यात दुपारी खिळे ठोकल्याचे आवाज येत होते असे काही स्थानिकांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक घटनास्थळी
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा आढावा घेतला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येत स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध सुरू केला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
- भाजपसोबत नाही! युसूफ पठाणसह तीन एनसीपीआय (NCPI) खासदारांची एनडीएच्या बैठकीला पाठ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
- पुणे:वृत्तपत्राच्या दणक्याने पुणे महापालिकेची नरमाई; कचरा प्रकल्पाच्या निविदेत दर कपात केल्याने तब्बल १४९ कोटी रुपयांची बचत!
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: इचलकरंजीतील तरुणाचे मालमत्तेच्या वादातून अपहरण करून निपाणीत निर्घृण खून; तिघे संशयित जेरबंद
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
- धाराशिव: तुळजापुरात मोठी दुर्घटना; उघड्या खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, सरपंचसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज



























Subscribe to my channel




