
Mumbai : शहरात सुरू असलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची डेडलाइन नुतकीच वाढवण्यात आली. याचं कारण म्हणजे वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडशी जोडणी देण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी गोरेगाव ते मागाठाणे दरम्यान 5.5 किमी लांब हायस्पीड कॉरिडोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला आहे. या कॉरिडोरमुळे या दोन्ही प्रकल्पांदरम्यान कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे.
प्रवासाचा वेळ केवळ 10 मिनिटांवर
गोरेगावमधील फिल्म सिटीपासून ते बोरिवली जवळील मागाठाणेपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा मार्ग पश्चि द्रुतगती मार्गाला समांतर असणार आहे. यामुळे मुंबईला पूर्व व पश्चिम उपनगरांशी सहजपणे जोडण्यात येणार आहे. संपूर्णपणे नवीन बांधलेल्या या प्रकल्पामुळे कोस्टल रोड ते लिंक रोड जोडणी मिळणार आहे. यामुळे गोरेगाव ते मागाठाणेदरम्यान अंतर 10 मिनिटांवर येणार आहे. हा मार्ग कोस्टल रोड आणि लिंक रोडमधील एक थेट दुवा बनणार आहे.
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडचा एका भाग पूर्व दिशेकडून विस्तारून तो मागाठाणे येथील मार्गाला जोडला जाईल. यामुळे मार्गावर थेट प्रवेश मिळवणं शक्य होणार आहे. तिथून वाहनचालक थेट पुढे लिंक रोडवर प्रवास करत मुंलुंड पर्यंत पोहचू शकतात. तसेच, नव्या तयार होणाऱ्या उड्डाणपुलामुळे थेट नवी मुंबईतील ऐरोलीपर्यंत पोहोचणे ही शक्य होणार आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अशी माहिती दिली की, हा मार्ग उभारण्यामागील हेतू मुंबईतील सर्व मुख्य उन्नत मार्ग आणि हाय स्पीड कॉरिडोर जोडणे आहे. तसेच, पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेली वाहतूक कोंडीवर हा एक महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.
कधी होणार पूर्ण?
सध्या प्रवासात महामार्ग आणि छोट्या मार्गावर प्रवास करत वाहतूक कोंडीच्या वेळी तब्बल 60 मिनिटांचा वेळ लागायचा. हा प्रवासाचा वेळ आता फक्त 10 मिनिटांवर येणार आहे. सध्या या प्रस्तावित मार्गावर काही अतिक्रमणे आणि अडथळे हटवावे लागतील. त्यानंतर अंदाजित खर्च, प्रकल्प अहवाल सादर करून निविदा काढण्यात येतील. त्यानंतर बांधकामाला सुरूवात करून 2029पर्यंत हा संपूर्ण मार्ग सुरू करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे.
मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या वर्सोवा ते भाईंदर मार्ग उभारण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता 25 किमी लांब असून मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारला जात आहे. पहिल्या टप्प्यात मरिन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकपर्यंतचा कोस्टल रोड वांद्रेपर्यंत विस्तारला आहे. हे दोन्ही मार्ग तयार करताच वांद्रे ते वर्सोवा थेट जोडणी मिळणार आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




