
Germany Attack : जर्मनीमधील मॅग्डेबर्ग येथे ख्रिसमस मार्केटवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मार्केटमध्ये घुसलेल्या भरधाव कारने अनेकांना चिरडलं. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर ६८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सौदी अरबच्या ५० वर्षीय डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. कार मार्केटमध्ये घुसल्यामुळे गोंधळ उडाला. जखमींवर नजीकच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. हा व्यक्ती कारमध्ये एकटात होता. आरोपी ५० वर्षांचा असून तो डॉक्टर आहे आणि मूळचा सौदी अरेबियाचा आहे. हा डॉक्टर जर्मनीमध्ये काम करतो. गेल्या २० वर्षांपासून हा डॉक्टर जर्मनीमध्ये राहतो. आरोपी डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कार मार्केटमध्ये घुसली त्यावेळी डॉक्टर एकटाच कारमध्ये होता.
|
|
कारमध्ये काही स्फोटकं असतील असा संशय आधी पोलिसांनी व्यक्त केला होता. पण तपासादरम्यान कारमध्ये काहीच आढळले नाही. अपघातानंतर ख्रिसमस मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला अटक केली. या घटनेमुळे जर्मनी हादरले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भरधाव कार थेट टाऊन हॉलच्या दिशेने असलेल्या मार्केटमधील गर्दीच्या दिशेने घुसली. मार्केटमध्ये गर्दी असल्यामुळे अनेक जणांना कारने धडक दिली. त्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. या घटनेचा सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध करण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




