
Nashik : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. विहिरीत कार कोसळून झालेल्या दुर्घटनेत दरगोडे कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गावावर एकाच वेळी नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढावली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री घडली. खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून परतत असताना दरगोडे कुटुंबाच्या मारुती सुझुकी एमपीव्ही कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दिंडोरीतील शिवाजीनगर भागातील राजे बँक्वेट हॉलजवळील शेतातील विहिरीत कार कोसळली. या अपघातात सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
प्रशासनाची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी संबंधित विहीरमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, धोकादायक विहिरींचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
क्षणात संसार उद्ध्वस्त
या अपघातात सुनील दरगोडे, त्यांची पत्नी रेश्मा आणि मुलगी गुणवंती यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे साडेतीन वर्षांचा चिमुकला मुलगा अनाथ झाला आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
दुसरीकडे, अनिल दरगोडे यांनी स्वतःच्या डोळ्यांसमोर पत्नी, मुलं आणि नातेवाईकांना गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही क्षणांत सर्व काही संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन भावंडांचा थरारक बचाव
या भीषण दुर्घटनेत श्रुती उमरे आणि नरेंद्र उमरे या बहीण-भावाचे प्राण थोडक्यात वाचले. सुरुवातीला ते कारमधून प्रवास करत होते, मात्र परतीच्या वेळी त्यांनी वडिलांच्या दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे ते या अपघातातून बचावले.
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




