CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची 'नायक' स्टाईल कारवाई, रुग्णालयात असुविधा पाहून तात्काळ डॉक्टरांचे निलंबन

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांचे निलंबन केले आहे. यामुळे अनेकांना अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची आठवण झाली.

नायक चित्रपटात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असेलला अनिल कपूर जशी भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करतो तशीच कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.कळवा रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार ठरवत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मध्ये भेट दिली. यावेळी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अॅक्शन घेत संबंधितांना निलंबित केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *