गेल्या महिन्यात राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक झाली. बहुचर्चित मुंबई महापालिकेचाही त्यात समावेश होता. अख्ख्या राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत महायुती वि. ठाकरे असा प्रामुख्याने सामना होता. यामध्ये भाजप-शिवसेना शिदे गटाने बहुमताचा आकडा पार करत विजय मिळवला. त्यानंकर गेल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. या सर्व बहुचर्चित कार्यक्रमांनंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या निवडीकडे लागलं आहे.
या दोन्ही पदांची घोषणा आज ( सोमवार 16 फेब्रुवारी) महापालिका सभागृहात होणार आहे. म्हणजेच मुंबई महानगर पालिकेत विरोधी पक्ष नेता कोण? याची आज अधिकृत घोषणा होणार असून सभागृहनेत्याचीही निवड पार पडणार आहे. एवढंच नव्हे तर समित्यांमधील सदस्यांची देखील घोषणा आज केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांचीही नावे देखील आज जाहीर होतील
मुंबई महानगर पालिकेत विरोधी पक्ष नेता कोण ?
मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर, दुसरी विशेष सभा आज, सोमवार 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या विशेष सभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पद यांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे गटनेते यांची पर्यायाने सभागृहनेते पदी निवड होते, तर विरोधी पक्षाच्या गटनेत्याची निवड ही विरोधी पक्षनेतेपदी होते. विरोधी पक्षाच्या सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याची निवड ही विरोधी पक्षनेतेपदी होईल.
त्यामुळे या निवडणुकीत सर्वत जास्त जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खणकर यांची सभागृहनेते पदी निवड होईल. आणि विरोधी पक्षाच्या, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेतेपदी होईल असं समजतं. दोन्ही पक्षांकडून महापौरांना जे पत्र प्राप्त झालं आहे, त्यानुसार, महापौर या दोन्ही गटनेत्यांची अनुक्रमे सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून नावे जाहीर करणार आहेत.
समित्यांमधील सदस्यांची देखील आज घोषणा
दरम्यान आज समित्यांमधील सदस्यांची देखील घोषणा केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्या असून या चारही समित्यांवरील नियुक्त सदस्यांची नावे आज जाहीर होतील. या सदस्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर येत्या 20 फेब्रुवारीला शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होईल. त्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केले जातील.
कोणत्या पक्षाचे किती सदस्य ?
स्थायी समिती ( एकूण सदस्य 26 ) – भाजप – 10, शिवसेना शिंदे – 04 , शिवसेना ठाकरे – 07, काँग्रेस – 03, मनसे – 01, एमआयएम – 01
सुधार समिती (एकूण 26) – भाजप – 10, शिवसेना – 04, शिवसेना ठाकरे 07, काँग्रेस – 03, मनसे – 01, एमआयएम – 01
शिक्षण समिती (एकूण – 22) – भाजप -9, शिवसेना शिंदे – 03, शिवसेना ठाकरे – 06, काँग्रेस – 02, एमआयएम – 01
बेस्ट समिती (एकूण सदस्य 16) : भाजप – 06, शिवसेना शिंदे – 02, शिवसेना ठाकरे – 05, काँग्रेस – 02, एमआयएम – 01
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



