राज्यातील जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुधारित नियमावली व कालबद्ध वेळापत्रक जाहीर केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि आधीच्या प्रक्रियेतील अटींमध्ये सुधारणा करत राज्य सरकारने हजारो पात्र शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या नियमांनुसार आता दरवर्षी ठराविक कालावधीत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
नव्या नियमावलीतील मुख्य मुद्दे व वैशिष्ट्ये:
-
दरवर्षी १ ऑगस्टपर्यंत पात्रता निकष: यापूर्वीच्या नियमांमुळे अनेक पात्र शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहत होते. परंतु, आताच्या सुधारित आदेशानुसार दरवर्षी १ ऑगस्टपर्यंत 'टीईटी' (TET) किंवा 'सीटीईटी' (CTET) परीक्षा उत्तीर्ण असलेल्या सर्व पात्र शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदे: या सुधारित धोरणांतर्गत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर नियमानुसार पदोन्नती दिली जाणार आहे.
-
कालबद्ध वेळापत्रक व ३१ ऑगस्टची मुदत: चालू शैक्षणिक वर्षातील संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पात्र शिक्षकांना प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीच्या बैठका घेऊन सेवाज्येष्ठता, टीईटी पात्रता आणि इतर निकषांची छाननी केली जाणार आहे. शासन घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे मागील काही काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पात्र शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासकीय कामकाजालाही गती मिळणार आहे.
शहर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
महाराष्ट्र
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
- रत्नागिरी: पोहायला गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू; मित्रांसोबत आनंदात गेलेला तरुण परतलाच नाही, परिसरात हळहळ
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त


























Subscribe to my channel




