Bhandara : भंडा-यात रस्त्यांची चाळण, नागरिकांच्या घरात पाणी शिरलं; पालिका लक्ष देईल का ?

Bhandara  : सतत पडत असलेल्या पावसामुळे भंडारा शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. भंडा-यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे छाेटे छाेटे अपघात घडू लागले आहेत. दरम्यान भूयारी गटार याेजनेसाठी खणलेल्या खड्डयांत पाणी साचत आहे. त्यातूनच अनेकांच्या घरात हे पाणी शिरत आहे. 

Balasore Train Accident Case : बालासोर ट्रेन अपघात प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक;

भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने भंडारा शहरातील अनेक रस्ते चीखलमय झाले आहेत. शहरात भूमिगत गटार योजनेचे कामे सुरू असून रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

राजेंद्र नगर, चरण पार्क या वॉर्डातील रस्त्यांची चाळण झाली असल्याने नागरिकांना जाणे येणे सुध्दा कठीण झाले आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांनी बकेटच्या सहायाने घरातील पाणी काढले आहे. याबाबत वारंवार तक्रार नगरपरिषदेला करण्यात आली मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply