Murtijapur News : अकाेला जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस, घराची भिंत अंगावर कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

Akola : अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत हाेत आहे. दरम्यान पावसामुळे जून्या घरांचे नुकसान हाेत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसाळ येथे एका वृद्ध महिलेचा राहत्या घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. 

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नवसाळ येथील लिलाबाई जानराव रोकडे (वय ७५, राहणार नवसाळ) या घरात गाढ झोपेत हाेत्या. पावसामुळे त्यांच्या घराची भिंत अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

या घटनेची स्थानिकांनी सकाळच्या सुमरास माहिती दिली. राेडके यांचा मृतदेह भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोसे यांनी घटनास्थळी भेट दिली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *