
Pune : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. या वर्षातील ‘जीबीएस’च्या रुग्णाचा पुणे जिल्ह्यातील पहिलाच मृत्यू असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
‘जीबीएस’च्या आजाराने नीरा येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला अशक्तपणा, हात पायाला मुंग्या येणे, हात पायांची हालचाल मंदावणे अशी काही लक्षणे दिसून येत होती. मेंदूच्या तपासण्या केल्यानंतर रुग्णाला ‘जीबीएस’ झाल्याचे निदान झाले. त्यानुसार नीरा येथील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, रुग्णाला उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारादरम्यान रक्तदाब वाढल्याने आणि श्वसनास त्रास झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना प्रकृती स्थिर होत असतानाच गुरुवारी सकाळी रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका आला. ‘जीबीएस’च्या संसर्गामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला.
पुरंदर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी भारती हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या आजाराची सर्व माहिती संकलित केली. दरम्यान, नीरेत आणखी एकाला जीबीएस झाल्याचे निदान झाले. मात्र, योग्य उपचारांमुळे तो बरा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
खासगी आणि इतर पाण्याचे स्त्रोत आता तपासण्याचे; तसेच सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. खासगी रुग्णालयांनी अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याची आरोग्य विभागाला माहिती देण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे नमुने पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. - डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
रुग्णाला 'जीबीएस'चा संसर्ग झाला होता. त्यातही 'जीबीएस'च्या गंभीर प्रकाराचा आजार आल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रक्तदाब वाढला. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला. 'जीबीएस'मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. -डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल
पुरंदर तालुक्यात एकाच गावात 'जीबीएस'च्या संसर्गाचे दोन रुग्ण आढळले आहे. त्यापैकी एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर योग्य वेळी झालेल्या उपचारांमुळे आजार बरा झाला आहे. आजाराच्या संसर्गाची जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घेतली असून, घटनास्थळी पाहणी केली आहे; तसेच आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षण करण्याबरोबर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. -चंद्रकांत वाघमारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



