
Australia Sydney Firing : ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील सिडनी येथील बोंडी समुद्रकिनाऱ्यावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी बोंडी बीचवरील गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. मृतांमध्ये एक संशयित हल्लेखोराचाही समावेश आहे. तर आणखी एका संशयित हल्लेखोर जखमी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या संशयिताची प्रकृती गंभीर आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी हे प्रकरण 'धक्कादायक आणि अत्यंत अस्वस्थ करणारे', असं म्हटलं आहे.
न्यू साउथ वेल्स पोलीस सध्या परिसरात शोध घेत आहेत. लोकांनी या परिसरात येणं टाळण्याचं आणि बातम्या पसरवणं टाळण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या भागापासून जवळ आयोजित होणाऱ्या हनुक्का नावाच्या उत्सवाशी याचा संबंध आहे किंवा नाही? याबाबत नेमकी माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा एक यहुदी सण आहे.
|
Pune : पुणे हादरले! ५ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; झाडाझुडपात मृतदेह आढळला |
दरम्यान, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्टनुसार ज्यू धर्मीयांचा उत्सव असल्यामुळे या ठिकाणी ज्यू धर्माचे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे सर्व जण इथे ज्यू धर्मातील अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या हनुका उत्सवाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी सिडनीच्या बोंडी बीचवर एकत्र आले होते, याचवेळी या ठिकाणी आलेल्या दोन व्यक्तींनी उपस्थित लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोघेजण काळे कपडे परिधान करून घटनास्थळी आले होते. त्यांच्या हातामध्ये दोन शॉटगन होत्या, त्यांनी इथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येत होता. वातावारण खूपच भीतीदायक बनलं होतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरात गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे, तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हा संपूर्ण परिसर आता पोलिसांनी पर्यटकांसाठी बॅन केला आहे, नेमका हल्ला का करण्यात आला? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या घटनेवर दु: ख व्यक्त केलं आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



