
Mumbai : आज, शनिवारी होणारी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अवघ्या १६ तासांवर असताना धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक स्थगित करण्याबाबत निर्णय आल्याचे एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांना प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीनंतर संकेतस्थळावर याद्याही करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला होता. मात्र, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धर्मादाय आयुक्तांकडून काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी के. डी. तळोकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तळोकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२७च्या कालावधीसाठी निवडले गेलेले द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे पदाधिकारी मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि प्रा. सूरज पंडित दैनंदिन प्रशासकीय कारभार पाहतील. केतकर आणि गणपुले निवडणुकीला उभे असल्याने मतदारयाद्या तयार करण्याच्या कामात हे दोघेही सहभागी नसतील, असेही या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तळोकर, भारदे, कुलकर्णी आणि प्रा. पंडित यांची उपसमिती २०२५च्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करतील, असेही सांगण्यात आले आहे.
धर्मादाय आयुक्तांनी या निर्देशांमध्ये काही मुद्दे नमूद केले आहेत. ६ ऑगस्ट २०२५ रोजी व्यवस्थापकीय समितीने दिलेला चेंज रिपोर्ट नाकारण्यात आला होता. अर्ज छाननी समितीची मुदत २७ सप्टेंबर २०२५ रोजी संपली होती. त्यामुळे या समितीने त्यानंतरचे अर्ज स्वीकारणे हे नियमांच्या विरोधात होते, असे सांगत या मुद्द्यांच्या आधारे या उपसमितीने मतदारयाद्या तयार कराव्यात, असे धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशात म्हटले आहे. यापूर्वीही नोव्हेंबरमध्ये धर्मादाय आयुक्तांनी याद्यांसंदर्भात निर्देश दिले होते.
'कायदेशीर मार्गाने जाणार'
'निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यातील कलम ४१ अन्वये धर्मादाय आयुक्तांना त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा आदेश देता येत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी साहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा आदेश बेकायदा ठरवून रद्दबातल केला होता. आता पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आणि अक्षरशः आयुक्तांनी मतदानाचा दिवस (१४ मार्च) तोंडावर असताना १३ मार्च रोजी धर्मादाय आयुक्तांनी निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कायदेशीर तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याने याविषयी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत', असे यापूर्वी निवडणूकप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका करणारे विश्वास उटगी यांनी सांगितले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel





Promote our brand and get paid—enroll in our affiliate program!
Promote, refer, earn—join our affiliate program now!
Your audience, your profits—become an affiliate today!