
Akola : अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे काल गुरुवारी संध्याकाळी एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 6 वर्षीय चिमुरडीचा समावेश असून, घरात साठवून ठेवलेल्या डिझेलमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यानं ही मोठी दुर्घटना घडली.
नेमकी घटना काय?
अकोल्याच्या अडगाव येथील आठवडी बाजाराजवळ शेख इब्राहिम यांच्या मालकीचं एक घर आहे. या घरात अनिल चव्हाण हे आपल्या कुटुंबासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. काल गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक या घराला आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला कचाट्यात घेतलं. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा करून ठेवलेला होता. आगीचा संपर्क या डिझेलशी आल्याने काही क्षणातच स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा घराबाहेर पडू लागल्या. यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये स्वरा प्रभुदास सोळंके (वय 6 वर्ष), अनिल उकर्डा चव्हाण (वय 27) आणि रत्ना उकर्डा चव्हाण (वय 55) असं मृतांची नावे आहेत. स्वरा आणि अनिल यांचा होरपळून मृत्यू झाला, तर रत्ना चव्हाण या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वरा सोळंके ही रत्ना चव्हाण यांच्या भावाची मुलगी होती तर अनिल चव्हाण हा स्वरा चव्हाण यांचा 27 मुलगा होता. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. ग्रामपंचायतीने तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला.
अडगाव परिसरावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच तेल्हारा आणि अकोट येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत तिघांचे प्राण गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक लॅबची (Forensic Lab) व्हॅन आणि पथकही रात्रीच अडगावात दाखल झाले असून, आगीचे नेमके कारण आणि डिझेल साठ्याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण अडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




