Ahilyanagar: : नोकरी लावून देण्याचं आमिष, लॉजवर वारंवार अत्याचार; अभिषेक कळमकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल

Ahilyanagar : अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात तरुणींशी गैरवर्तन, अत्याचार आणि धमकावल्याच्या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एका 22 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, नोकरीचं आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन, शिवीगाळ आणि जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंगचा आरोप
दरम्यान, 22 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या गुन्ह्यातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शाळेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत ओळख वाढवली. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे प्रकरण अधिकच तापले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी
तरुणीने या प्रकाराला विरोध करत गाडीतून उतरल्यावर कळमकर यांनी शिवीगाळ करत 'ही बाब कुठे सांगितली तर जिवंत सोडणार नाही', अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. राजकीय प्रभावामुळे भीती वाटत असल्याने आजपर्यंत तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र, अन्य महिलेसोबतही अशाच प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तिने धाडस करून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.


आरोपी फरार; पोलिसांची दोन पथके रवाना
सदर गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पुढील तपासासाठी तो तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष दोन पथके स्थापन केली आहेत. ही पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

2 thoughts on “Ahilyanagar: : नोकरी लावून देण्याचं आमिष, लॉजवर वारंवार अत्याचार; अभिषेक कळमकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल

Leave a Reply to Desirae679 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *