
Pune : पुण्यासह राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटले, तरी आरोपीविरोधात न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज केला आहे. या अर्जांवर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच आरोप निश्चिती होऊन खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी पीडिता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे.
काय आहे प्रकरण?
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
आरोपपत्र आणि साक्षीदारांचे जबाब
तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपी गाडेविरोधात पुरावे गोळा केले. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांच्या आत पोलिसांनी गाडेविरोधात ८९२ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात ८२ साक्षीदारांकडे तपास करून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविले आहेत. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार काम पाहत आहेत, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत.
आरोपी गाडेने जामीन मिळण्यासाठी केलेले दोन्ही अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे; तसेच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्ततेसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्याला पुणे पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध केला आहे. ‘आरोपीच्या अर्जावर उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर या खटल्यात आरोप निश्चिती होईल. त्यानंतर आरोपीविरोधात खटल्याची सुनावणी सुरू होईल,’ असे विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
तपासातील ठळक मुद्दे
- घटनास्थळावर केस व शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी दत्तात्रय गाडे याचेच असल्याचे निष्पन्न झाले.
- आरोपी गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून होता; तसेच तो पीडितेशी बोलत होता, असे पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
- आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
- पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत.
- स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
- आरोपीच्या मोबाइल क्रमांकावरून सायबर तज्ज्ञांनी त्याची 'गुगल सर्च हिस्टरी' तपासली. त्यात आरोपी गाडे अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे आढळले. त्यामुळे 'गुगल सर्च हिस्टरी'चा पंचनामा करण्यात आला.
- ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




