हुबेहूब एकनाथ शिंदे….मुख्यमंत्र्यांसारखा दिसणारा भाजपचा कार्यकर्ता सध्या ठरत आहे लोकांचे आकर्षण

पुणे : एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. असं असतांना पुणे शहरातील आणखी एक व्यक्ती चर्चेत आला आहे, चर्चा आहे ती संबंधित व्यक्ती हुबेहूब एकनाथ शिंदे यांच्यासारखी दिसते याची. त्या व्यक्तिचे नाव आहे विजयराज माने आणि ही व्यक्ती आहे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता.त्यामुळे पुणे शहरात भाजपाचे एकनाथ शिंदे हे एक चर्चेचा विषय ठरले आहेत.

“मी भाजपाचे गेली अनेक वर्षांपासून काम करीत आहे.यामुळे अनेक व्यक्तींशी नेहमीच संपर्क येत असतो.पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या सोबत असलेले अनेक जण म्हणाले की तू एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत आहे. या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे. मी आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फॅन सुरुवातीपासूनच आहे.या दोन्ही नेत्यांची कामाची पद्धत वेगळी असून यांनी अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. या नेत्यांसारखं काम करण्याची इच्छा आहे” अशी प्रतिक्रिया विजयराज माने यांनी दिली आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यावेळी त्यांना भेटायचे असून निश्चित भेट होईल असा विश्वास विजयराज माने यांनी व्यक्त केला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *