पत्नीच्या वाढदविशीच पतीचं धक्कादायक कृत्य
नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं नातं असतं. दोघांनीही एकमेकांना सुखदु:खात साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या असतात. केवळ आणि केवळ एकमेकांच्या विश्वासावरच हे नातं टिकून असतं. संसाराचा गाडा हाकताना या नात्यात कधी कधी मिठाचा खडा पडतो. पण अशावेळी दोघांपैकी एकाने एक पाऊल मागं टाकून दोन पावलं पुढं जाणंच नेहमी सोयीस्कर असतं. पण ते होताना दिसत नाही. अनेकदा टोकाची भांडणं होतात आणि मग थेट जीवनाचा अंत होण्यापर्यंत गोष्ट जाते. भांडणं शुल्लक असतात. पण त्याचा मनस्ताप फार मोठा असतो. जीवघेणा असतो. लोणावळ्यात असाच जीवघेणा प्रकार घडला. हसऱ्या खेळत्या संसराला कुणाची तरी नजर लागावी असं घडलं आणि क्षणार्धात सर्व काही कोलमडलं. असं काय घडलं त्या दोन जीवांमध्ये?
पत्नीचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. वीरेंद्र सिन्हा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सध्या हिंजवडी येथे नोकरी करत होते. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. 12 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून त्यांनी पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंबर ब्लॉक असल्याने संभाषण होऊ शकले नाही. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर टायगर पॉईंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. वीरेंद्र सिन्हा हे हिंजवडीत कंटेनर सेल विभागात कार्य करत होते.
काय घडलं नेमकं?
वीरेंद्र सिन्हा हे पुण्यात पत्नीसोबत राहत होते. क्षुल्लक कारणावरून त्यांचे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर ते घरा बाहेर पडले. पण नंतर संध्याकाळपासून त्यांनी पत्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण नंबर ब्लॉक असल्याने संपर्क झाला नाही. त्यांनी रात्रीपर्यंत प्रयत्न केले. पण संपर्कच झाला नाही. त्यामुळे वीरेंद्र अधिकच तणावात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पहाटे लायन्स पॉइंट येथे त्यांची चारचाकी गाडी संशयास्पदरित्या आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि वीरेंद्र यांनी टायगर पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. ज्या ठिकाणी वीरेंद्र यांची कार उभी होती, त्यासमोरी 250 फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने शोधाशोध घेऊन त्यांचा मृतदेह शोधून काढला.
पत्नीला मेसेज, व्हिडीओ
दरम्यान, मृत्यूपूर्वी वीरेंद्र यांनी त्यांच्या पत्नीला मेसेज आणि व्हिडीओ केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्हिडीओत त्यांनी नेमकं काय म्हटलं? आणि काय मेसेज आहे? याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी मित्रांनाही ई-मेल आणि मेसेजद्वारे काही टोकाचे संकेत दिले होते, अशी माहिती समोर आली असून पोलीस त्याचाही छडा लावत आहेत.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




