मुंबईत अवकाळी पाऊस; चाकरमान्यांची उडाली तारांबळ

मुंबई: राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे पारा चढलेला असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुंबई पूर्व उपनगरात पाऊस पडला. यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. पावसात भिजू नये यासाठी आपल्या दुचाकी झाडाखाली आणि ब्रिज खाली लावण्यात आल्या. तसेच पायी चालणाऱ्यांनी मिळेल तिथे आसरा घेतला.

मुंबईसह कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या मुंबई विभागाने पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्‍ये पुढील 3-4 तासांमध्‍ये विजांच्या कडकडाटासह वादळ वाहील असा इशारा  दिला होता. तसेच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यताही वर्तवली आहे. यावेळी घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असं आवाहन आयएमडीच्या मुंबई विभागाने केलं आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *