
जेजुरी : रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची आणि राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिवरायांनंतर स्वराज्याची ज्योत पेटवण्याचे कार्य आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी केले. त्यांना दैवत मानणारे आपले सरकार आहे. रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवडी (ता.पुरंदर) येथे सांगितले.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शासकीय जयंती सोहळ्यात कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,विजय शिवतारे ,बाळा भेगडे, योगेश टिळेकर, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, गणेश भेगडे, राजे उमाजी नाईकांचे वंशज चंद्रकांत खोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे, रामदास धनवटे आदी त्या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जातींमधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत, यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. काही मागण्या राज्याच्या व केंद्राच्या अखत्यारीत आहेत. सर्व मागण्यांच्या निर्णयासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असून, समाजाच्या सर्व समस्या निकाली काढल्या जातील. तुम्ही सर्वांनी मिळून भाजप व शिवसेनेला निवडून दिले .दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. राजे उमाजी नाईक यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता म्हणून भगवा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे आमच्या सोबत आले. आता मुख्यमंत्री आणि मी तुम्ही दिलेल्या मागण्या पूर्ण करू.
शहर
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
महाराष्ट्र
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



