
पुणे : वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेआठ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
शहरात वाहतूक बदल
शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदाेबस्तात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेआठ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.– आर. राजा, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा
दृष्टिक्षेपात बंदोबस्त
पोलीस उपायुक्त १०
सहायक पोलीस आयुक्त २३
पोलीस निरीक्षक १३८
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६२५
पोलीस कर्मचारी ७,७४२
शहर
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
महाराष्ट्र
- पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 'ब्रेकथ्रू'तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण; कामाला वेग!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




