Murder or Accident? Builder’s Son Ketan Agarwal Dies Before Grand Wedding; Fiancée Arrested Amid Conspiracy Allegations.

सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!

Murder or Accident? Builder’s Son Ketan Agarwal Dies Before Grand Wedding; Fiancée Arrested Amid Conspiracy Allegations.लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता एक नाट्यमय आणि धक्कादायक वळण घेतले आहे. पिंपरी-चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असलेला केतन अग्रवाल हा नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे अतिशय भव्य आणि शाही विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, लग्नाआधीच केतनचा मृत्यू झाल्याने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

सुरुवातीला ही घटना केवळ एक अपघात असल्याचे वाटत होते. केतन आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथे ट्रेकिंग आणि फोटोशूट करत असताना तो दरीत कोसळल्याची माहिती समोर आली होती. बचाव पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला दरीतून बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता.

परंतु, या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, प्रकरणाची सूत्रे बदलली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या होणाऱ्या पत्नीवर त्याला दरीत ढकलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कथित कटात तिच्या काही मित्रांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि घटनास्थळावरील परिस्थितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या शहनाईच्या जागी आता शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *