जालना जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत पोलिस प्रशासनाने केलेल्या विविध कारवायांमध्ये तब्बल १५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व परदेशी नागरिक बनावट आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर यातील काही जण मजूर म्हणून काम करत होते, काहींनी चोरीसारखे गुन्हे केले आहेत, तर काही महिला वेश्या व्यवसायात अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पीडित महिलांचा जबाब आणि एजंटांचा शोध: पकडण्यात आलेल्या एका महिलेने पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या देशात (बांगलादेशात) उपासमार सुरू असल्याने पोट भरण्यासाठी ते भारतात आले. मात्र, भारतात आल्यानंतर एजंटांकडून त्यांची मोठी लूट केली जात असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घुसखोरीच्या प्रकरणात महत्त्वाचे सूत्रधार असलेले एजंट अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत, ते मोकाट आहेत.
विविध कारवायांचा घटनाक्रम:
-
केस १: विधानसभा निवडणुकीदरम्यान चेक पोस्टवर तपासणी करताना 'जन्नातुल अख्तर काझी मुरशाद मिया' (१९) या महिलेला पकडण्यात आले.
-
केस २: आन्वा येथे कामाला असलेल्या इमदाद हुसेन मोहम्मद अली अहेमद (सिपॉन), हुमायुन कबीर मोहम्मद अली अहमद आणि मानिक जैनुल्लादीन खान या तिघांना ताब्यात घेतले.
-
केस ३: मुंबईत घरफोडी करून परतूरमध्ये आलेल्या शाकीर ऊर्फ गुड्डू हैदर शेख, कुर्बान शाहिन आलम मंडल, जाकीर फकीर बारीक, माणिक ऊर्फ युनूस हुसैन मुस्लिम शेख आणि शुमोन जोबेदअली शेख यांना अटक करण्यात आली.
-
केस ४: बदनापूर पोलिसांनी बांगलादेशातील बेरोजगारी व उपासमारीमुळे वैध कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या असलम मनी काजी आणि बुलबुली मुस्ताफजुर रहमान यांना ताब्यात घेतले.
-
केस ५: वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांचे मोठे रॅकेट: या सर्व कारवायांतून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे या घुसखोरांना भारताचे नागरिक असल्याचे भासवण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि रहिवासी पुरावे तयार करून दिले जात होते. ही बनावट कागदपत्रे कोणी तयार केली आणि त्यांना स्थानिक पातळीवर कोणाची मदत मिळत आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सचिन इंगेवाड यांनी माहिती दिली की, गेल्या दीड वर्षात ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये या १५ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- साताऱ्यात रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणात मोठा घोळ! नव्या इमारतीला तडे, निकृष्ट कामामुळे प्रवाशांची गैरसोय
गुन्हा
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार

























Subscribe to my channel




