Shocking Injustice: Mother Climbs Mobile Tower with Young Son After Husband Remarries and Abandons Them.

लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!

Shocking Injustice: Mother Climbs Mobile Tower with Young Son After Husband Remarries and Abandons Them.बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील बिहारीगंज भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी गुड्डी देवी नावाच्या एका महिलेने आपल्या १२ वर्षांच्या मुलासह चक्क एका मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

 

 

घटनेचा पार्श्वभूमी:

गुड्डी देवी हिचा सुमारे १० वर्षांपूर्वी अमरेन्द्र ठाकूर या व्यक्तीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांचे वैवाहिक आयुष्य काही काळ सुरळीत चालले आणि त्यांना एक १२ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, नंतरच्या काळात अमरेन्द्रने गुड्डी देवीच्या नकळत दुसरे लग्न केले. पत्नीला आणि मुलाला घराबाहेर काढल्यानंतर त्यांनी गुड्डी देवीला वाऱ्यावर सोडले.

न्यायासाठी शेवटचा पर्याय:

पतीने केलेली फसवणूक आणि घराबाहेर काढल्यामुळे गुड्डी देवीने अनेकदा पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, गरीब आणि असहाय्य असल्यामुळे तिची कोणीही दखल घेतली नाही. सततच्या उपेक्षेमुळे आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या गुड्डी देवीने अखेर यंत्रणेला जागे करण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले.

प्रशासनाची धावपळ:

टॉवरवर चढल्यानंतर गुड्डी देवीने आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) स्वतः येऊन न्यायाचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी अट ठेवली. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बॅरिकेड्स लावून सुरक्षेचे उपाय केले आहेत. माय-लेकाला सुखरूप खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *