औरंगाबाद : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 500 हून अधिक लोकांना विषबाधा

औरंगाबाद येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 500 हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल रात्री लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, प्रकृती स्थिर असल्याने बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल 4 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच उलट्या व मळमळीचा त्रास सुरु झाला त्यामुळे त्यांना जवळच असलेल्या एमजीएम व घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे.

जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले होते. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले. मात्र याचे प्रमाण वाढताच हे लग्नातील जेवणातून झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *