पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; दुर्घटनेत 4 जण जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती इथं ट्रक आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला.

आज सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत जवळील रस्त्यावरून कार गाडीतून चौघे सोलापूरच्या दिशेनं निघाले होते. यावेळी कारच्या पुढं असलेल्या मालवाहू ट्रकनं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागं असलेल्या चारचाकी चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटून चारचाकी गाडी थेट ट्रकच्या खाली आली.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) चारचाकी गाडीत अडकलेल्या चौघांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातातील चौघे कोण आहेत, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *