पुणे : सेलिब्रेशनच्या दोन दिवसआधी पोलिसांची मोठी कारवाई; कोट्यवधीची दारू जप्त

पुणे - नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला आहे. मात्र त्याआधीच पुण्यात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. ऐन "थर्टी फर्स्ट" सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *