
पुणे : पुणे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दुचाकीस्वाराला दुसऱ्या चालकाने कट मारल्याचा रागातून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुषार जयवंत भोसले (२४) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या गंभीर प्रकरणाची विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीनं दखल घेवून हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. बाळु अर्जुन शिंदे (48, रा. विश्रांतवाडी), फ्रान्सेस स्वामी ऊर्फ भैय्या ऍन्थोनी स्वामी (20), सर्फराज सलीम शेख ऊर्फ गोल्या ( 20, रा.धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख (22, रा. भीमनगर विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी आदित्य भोसले (22) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भोसले आणि भैय्या स्वामी यांच्यात दुचाकीला कट मारल्याच्या रागातून वादविवाद झाला होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसले व स्वामी यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर तुषार भोसले या व्यक्तीने जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून विश्रांतवाडी येथील वडारवस्तीमध्ये भैय्या स्वामीचा शोध घेतला. त्यावेळी ते बाळू शिंदे याच्या घरात घुसले. त्यानंतर हल्लेखोरांनी शिंदे याला जबर मारहाण केली. त्याचा राग आल्याने शिंदे व त्याच्या घराजवळ जमलेले सर्फराज, अकबर हे हत्यारे घेऊन भोसले व त्याच्या मित्रांच्या पाठीमागे धावले. त्यावेळी शिंदे व त्याचे साथीदार आणि भोसले व त्याच्या साथीदारांनी एकमेकांवर दगडफेक केली.
त्यानंतर शिंदे व त्याच्या साथीदारांनी भोसलेला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. विश्रांतवाडी पोलिसांची दोन पथके आरोपींच्या मागावर होती. पोलिसांनी विश्रांतवाडी येथील वडारवाडी व भीमनगर परिसरातून चारही संशयित आरोपींना अटक केली.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




