पुणे : जिल्ह्यामध्ये ८४ गावे पूरप्रवण असून, या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अलीकडच्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्ह्यामधील पूरप्रवण गावांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक १६ गावे आहेत. त्यानंतर मावळ तालुक्यातील दहा, आंबेगाव आणि शिरुरमधील प्रत्येकी नऊ, मुळशी तालुक्यातील सात, भोरमधील तीन गावांचा समावेश आहे. इंदापूर, बारामती, खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक, जुन्नारमधील दोन गावे आहेत. या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण गावे यांबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढले असल्याने आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील धोकादायक ठिकाणे
हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुलाचीवाडी, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतीनगर आणि इंदिरानगर, संगमवाडी, लोणीकाळभोर, चांदे, वाकड, औंध, दापोडी, सांगवी, बाणेर, हिंगणगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चोवीसवाडी, निरगुडे, सांगवी.
जिल्ह्यातील प्रमुख पूरप्रवण गावे
भोरमधील पऱ्हाटी, लुमेवाडी आणि निरा, खेड तालुक्यामधील सांगुर्डी, आंबेगाव तालुक्यातील चांडोली, पारगाव, निगुडसर, नारेाडी, चिंचोली, जवळे, पडवळ, गणेगाव दुमाला, बाभुळसर आणि तांदळी, जुन्नर तालुक्यातील सारवरगाव आणि नारायणगाव, हवेली तालुक्यामधील पिंपरी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, पेरणे, आष्टापूर, नाव्हीसांडस, वडू खुर्द, शिरुरमधील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, वडगाव रासाई, वढू बुद्रुक, आपटी, रांजणगाव, सांडस आणि म्हाळुंगे, दौंडमधील नांदूर, वडगाव, काशिंबे, गोनवडी, खोरवडी, वडगावढेरे, पेडगाव, सोनवडी, मलठण, बावडा, गणेशवस्ती, भांडगाव हातवळण, हिंगणेबेरडी आणि शिरापूर, इंदापूरमधील निरा नरसिंगपूर, मावळमधील भावडी, पुलगाव, सांगवी सांडस, लोणावळा, कामशेत आणि वडगाव मावळ; तसेच देहू आणि आळंदी यांचा समावेश आहे
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




