पुणे गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडून अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू असताना, बुधवारी (ता. २०) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानची नदीपात्रालगतचे हॉटेल, मंगल कार्यालय, गॅरेजसह इतर अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढविण्यात आला. सकाळी साडेसात वाजता महापालिकेने ही कारवाई सुरू करून दुपारी एकपर्यंत ६८ अतिक्रमण पाडून नदीलगतची हरित पट्ट्यातील व निळ्या पूररेषेतील तब्बल चार लाख चौरस फूट जागा मोकळी केली.
महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे, फ्रंट व साइड मार्जिनमधील बांधकाम, शेड यावर अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या कारवाईत व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने खराडी भागात पथकावर हल्लादेखील झाला, त्यानंतरच महापालिकेने कारवाई अधिक कडक केली आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर नदीपात्राच्या बाजूने हरित पट्टा असून, निळी पूररेषा आहे, त्यामुळे तेथे बांधकाम करता येत नाही. पण, या रस्त्याच्या बाजूने अनेक मंगल कार्यालय आहेत. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची हॉटेल सुरू झाली आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर मोठी गर्दी या भागात होते. महापालिकेने यापूर्वी एक-दोन मंगल कार्यालयाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र, सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई केली नव्हती. बुधवारी महापालिकेने नोटिसा बजावून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.
सकाळी सहापासून महापालिकेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. साडेसात वाजता कारवाई सुरू होताच, या भागातील व्यावसायिकांची धांदल उडाली. परिसरातील हॉटेल, मंगल कार्यालय चालकांनी राजकीय नेत्यांचा दबाव आणून कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने त्यास न जुमानता कारवाई केली. जेथे जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे गॅस कटरचा वापर करून आतमध्ये घुसून शेड तोडण्यात आले. जेसीबीने थेट बांधकाम, पत्र्याच्या शेडवर वार केला जात असल्याने हॉटेल, दुकाने, गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.
महापालिकेने डीपी रस्त्यावर कारवाई सुरू केलेली असताना, सकाळी म्हात्रे पुलाजवळील एका मंगल कार्यालयात लग्न होते. वधु-वर, नातेवाईक नटून थटून कार्यालयात आले, काही वेळात विधीही सुरू झाले. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या जेसीबीने थेट मंगल कार्यालयावर कारवाई सुरू केली. तेथील मांडव पाडण्यात येत असल्याने एकच गोंधळ उडाला. महापालिकेने या मंगल कार्यालयाला नोटीस बजावली होती, पण, त्याकडे दुर्लक्ष करून लग्नाची तारीख घेतली आणि अचानक आज कारवाई झाली. वधू-वराकडील नातेवाइकांनी मंगल कार्यालय चालकाला जाब विचारला. या कारवाईमुळे आनंदावर विरजण पडल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. अखेर शेजारील एका कार्यालयात हे लग्न पार पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
कारवाई दृष्टिक्षेपात...
- सकाळी सहापासून कारवाईसाठी यंत्रणेची जमावजमाव
- सकाळी साडेसात ते दुपारी दोनपर्यंत कारवाई
- आठ पथकांमध्ये पोलिस, सुरक्षारक्षक व सेवक, असे ३०० मनुष्यबळ
- ७६ पैकी ८ मिळकतींवर न्यायालयाकडून कारवाईस स्थगिती
- ६८ अनधिकृत बांधकाम, शेड जमीनदोस्त
- २५ वाहने, २० जेसीबी, १२ गॅसकटर, ८ ब्रेकरने कारवाई
अतिक्रमण व बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ७६ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील आठ मिळकतींवर कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व ६८ बेकायदा मिळकतींवर आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. याठिकाणी पुन्हा नव्याने अतिक्रमण करू नये. अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

