
सध्या राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेना या पक्षातून सुरुवात झाली. ते शिवसेनेचे पहिले आमदार होते. मात्र पुढे त्यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष सोडला. त्यांनी काही आमदारांनी घेऊन बंडखोरी केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ठिकठिकाणी त्यांना शिवसैनिकांकडून विरोध होत होता. त्याचीच आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली आहे. तेव्हा शिवसेना पक्षात येण्याची संधी होती. मात्र पक्षाबाहेर जाण्यासाठी रस्ता नव्हता, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘एबीपी माझा’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
मी जेव्हा शिवसेना पक्ष सोडला तेव्हा मला काही शिवसैनिक मारायला आले होते. तेव्हा माझ्यासोबत ३६ आमदार होते. त्यातील १८ तर आलेच नाही. पुढे विधानसभा अध्यक्षांसमोर आम्ही शिवसेना सोडली असे सांगितले. या १८ आमदारातील ६ आमदार परत मुंबईला गेले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला तेव्हा माझ्यासोबत १८ आमदार होते. त्यामुळे शिवसेनेची फाळणी झाली असे स्पष्ट झाले. पुढे पाच सहा दिवसांत १८ आमदारांमधील परत सहा आमदार गेले. मात्र आमची आमदारकी वाचली होती, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
पुढे ज्या लोकांनी बंड केले त्यातील एक-दोन निवडून आले. बाकीचे काही विशेष करू शकले नाहीत. तेव्हाचे पोलीस कमिशनर आम्हा १२ आमदारांना सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. आम्हाला शोधण्यासाठी सगळेच पूर्ण तयारीत होते. आमच्या मनात भीती होती. आम्ही भेटलो असतो तर त्यांनी (शिवसैनिक) सोडले नसते. मी मुंबईत विशेष विमानाने परतलो होतो. तेव्हा रस्त्यावर माझगावच्या घरापर्यंत काचेचा सडा पडला होता. मी कुठे चाललो की आडवे यायचे, दगडफेक व्हायची. डोकी फुटायची. तेव्हा काँग्रेसचे नेते मध्ये यायचे नाहीत. माणूस शिवसेनेत जाऊ शकतो. पण बाहेर येण्यासाठी रस्ता नाही, अशी तेव्हा परिस्थिती होती. आता शिवसेनेत सात-आठ दरवाजे उघडे आहेत, असे भुजबळ म्हणाले.
शहर
- शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
- कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरला वेग; अडथळे दूर, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू!
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
महाराष्ट्र
- Fraud in Sangli: Man Duped of Rs 9 Lakhs on Pretext of Providing Industrial Fuel
- शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
- कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरला वेग; अडथळे दूर, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू!
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.


























Subscribe to my channel



