पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान गेल्या काही दिवसांपासून रावळपिंडीतील आडियाला तुरुंगात आहेत. आता त्यांच्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे. इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत माहिती ऐकून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. आता त्यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इमरान खान गेल्या कित्येक दिवसांपासून डोळ्यांशी संबंधीत आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्या डोळ्याच्या स्थितीवर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टमध्ये एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, इमरान खान यांच्या डोळ्यांची दृष्टी फक्त १५ टक्के राहिली आहे, ज्यामुळे ते योग्यरित्या पाहू शकत नाहीत. त्यांना तात्काळ उपचारांची गरज आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, जर लवकरात लवकर उपचार केले गेले नाहीत तर ते दोन्ही डोळे पूर्णपणे गमावू शकतात. बीबीसी उर्दूच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली आहे. कोर्टाने सरकारला सांगितले आहे की, १६ फेब्रुवारीपूर्वी देशातील डॉक्टरांची एक टीम पाठवा आणि त्यांचे योग्य उपचार करा.
इमरान खानबाबत आणखी काय सांगितले गेले?
खरे तर, सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील सलमान सफदर यांना इमरान खान यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. सफदर यांनी इमरान यांची भेट घेतल्यानंतर एक अहवाल तयार केला. या अहवालात म्हटले आहे की, इमरान यांना आपल्या सुरक्षिततेबाबत समाधान आहे, पण त्यांना कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी दिली जात नाही. सफदर यांनी आपल्या अहवालात सांगितले की, ऑक्टोबर २०२५ पर्यंत इमरान ठीक होते, पण त्यानंतर त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी अचानक गेली. सफदर यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, ते शारीरिकदृष्ट्या निरोगी आहेत, पण पाहू शकत नाहीत. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. सफदर यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की, त्यांना त्यांच्या मुलांशी बोलण्याची व्यवस्था करावी. यावर सरकारच्या वकिलाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टाने इमरान खान यांना त्यांच्या दोन्ही मुलांशी फोनवर बोलण्याची परवानगी दिली आहे.
इमरान खान यांच्या डोळ्यात काय समस्या आहे?
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय)च्या माहितीनुसार, इमरान खान यांच्या उजव्या डोळ्यात सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लूजन (Central Retinal Vein Occlusion) झाले आहे, ज्यामुळे डोळ्यातील नसांमध्ये “धोकादायक अडथळा” निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, त्यांचे उपचार झाले आहेत. पक्ष यावर समाधानी नाही. नॅशनल हेल्थ फाउंडेशनच्या मते, या आजारात डोळ्यातील नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. इमरान खान मे २०२३ पासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि सेनेविरुद्ध लोकांना उकसवण्याचा आरोप आहे.
शहर
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!




























Subscribe to my channel




