धर्म म्हणजे काय? ‘धर्म’ या शब्दाची उत्पत्ती ‘धृ’ धातूपासून झाली आहे, ज्याचा अर्थ होतो- धारण करणे आणि सांभाळून ठेवणे. धर्माचा अनुवाद कर्तव्य, सदाचार, नैतिकता, कायदा किंवा समाजाला सांभाळून ठेवणारी नैतिक-व्यवस्था या अर्थाने केला जातो. परंतु यापैकी कोणताही शब्द धर्माचा व्यापक अर्थ व्यक्त करत नाही. हिंदू-दृष्टिकोनात धर्म म्हणजे अस्तित्वाच्या नैतिक गुंतागुंतीतून मार्ग शोधण्याची पद्धत आहे. धर्म निःसंशयपणे आचरणासाठी एक स्पष्ट नैतिक आराखडा प्रदान करतो, परंतु तो बायबलमधील ‘टेन कमांडमेंट्स’सारखी कोणतीही कठोर नियमावली नाही. मानवी विवेक आणि व्यवहाराने परिस्थितीनुसार धर्माला अनेक घटकांमुळे प्रभावित होण्याचा वाव दिला आहे. यात देश-धर्म म्हणजेच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये प्रचलित असलेले आचरण, आश्रम-धर्म म्हणजेच जीवनाच्या अवस्थेनुसार असणारे कर्तव्य, कुल-धर्म म्हणजेच कुटुंबाप्रति असलेले दायित्व, जाती-धर्म म्हणजेच जातिनिष्ठ निष्ठा, स्वभाव-धर्म म्हणजेच व्यक्तीची प्रवृत्ती, स्वधर्म म्हणजेच अंतरात्म्याच्या विवेकाने केलेली निवड आणि आपद्धर्म म्हणजेच संकटाच्या वेळी स्वीकारले जाणारे आचरण यांचा समावेश होतो. धर्म आपल्याला सांगतो की, कुणावरही निर्णय देण्यापूर्वी संदर्भ, हेतू, परिस्थिती आणि परिणामांची पडताळणी करा. परंतु हीच गुंतागुंत लोकांना त्यांच्या चुका योग्य ठरवण्यासाठी धर्माचा वापर करण्यास वाव देते. एखादे चुकीचे काम केल्यावर शक्तिशाली लोकांची नेहमीची प्रतिक्रिया आठवा. ते म्हणतात- परिस्थितीने मला भाग पाडले, राजकीय दबाव होता, सुरक्षेशी संबंधित प्रश्न होते, हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला, यासाठी जबाबदार दुसरेच कुणीतरी होते, हेतू चुकीचा नव्हता, इत्यादी. अशा प्रकारे तर प्रत्येक चुकीच्या कामासाठी एक निमित्त बनवले जाऊ शकते. जर प्रत्येक उल्लंघनासोबत कोणते ना कोणते स्पष्टीकरण दिले जात राहिले, तर हळूहळू स्पष्टीकरण हाच दोषमुक्तीचा आधार बनू शकतो. हिंदू महाकाव्ये अशा परिस्थितींनी भरलेली आहेत, जिथे वरवर पाहता धर्मसंमत वाटणारा मार्ग दुसऱ्या एखाद्या नैतिक जबाबदारीशी भिडतो. सत्य आणि करुणा समोरासमोर येऊ शकतात; निष्ठा आणि न्यायामध्ये संघर्ष होऊ शकतो; कुटुंबाप्रति असलेले कर्तव्य आणि समाजाप्रति असलेले दायित्व एकमेकांच्या विरोधात उभे राहू शकतात; आणि वैयक्तिक सदाचाराचा संघर्ष एखाद्या सामूहिक उद्देशाशी होऊ शकतो. विशेषतः महाभारत हे नैतिकतेचे नियम-पुस्तक कमी आणि नैतिक दुविधांची एक विशाल प्रयोगशाळा जास्त आहे. म्हणूनच हिंदू मानसिकता जगाला संत आणि पापी अशा दोन भागांत विभागण्यास कचरते. दुर्योधन निःसंशयपणे गंभीर अधर्मासाठी जबाबदार आहे, तरीही महाकाव्यात त्याच्या मृत्यूच्या वेळी स्वर्गातून त्याच्यावर फुले उधळली जातात. रावण अशी कृत्ये करतो, ज्यांचा नैतिकदृष्ट्या बचाव करता येत नाही, तरीही रामायण त्याला एक विद्वान आणि महान शिवभक्त म्हणूनही आठवते. तुम्ही म्हणू शकता की, एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा मिळण्यापेक्षा अनेक गुन्हेगार सुटून जाणे अधिक चांगले, हा सिद्धांत मानवी आहे. परंतु जर व्यवस्था इतकी गुंतागुंतीची झाली की कुणाचाही दोष सिद्ध करणे जवळजवळ अशक्य होईल, तर एखाद्या चांगल्या हेतूचेदेखील वाईट परिणाम होऊ शकतात. दुर्दैवाने आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ज्याच्याकडे जितकी जास्त ताकद असते, त्याच्याकडे आपल्या चुकांची तितकीच अधिक कारणेहीउपलब्ध असतात. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, धर्म जरी संदर्भावर अवलंबून असला, तरी याचा अर्थ असा नाही की त्याचे कोणतेही परिणाम होत नाहीत. त्याचप्रमाणे, कायदा आणि नैतिकता या एकच गोष्टी नाहीत. एखादे काम कायदेशीररीत्या सिद्ध करणे कठीण असू शकते, तरीही नैतिकदृष्ट्या त्याचा बचाव करता येऊ शकत नाही. एका परिपक्व समाजाने या दोन्हीतील फरक समजून घेतला पाहिजे. वास्तवात, धर्मसंमत नैतिकता हाच प्रश्न विचारते की, आपल्या कर्माला योग्य ठरवण्यासाठी आपण किती चतुर तर्क देऊ शकतो, ही धर्माची कसोटी असू शकत नाही. तर आपण आपल्या कर्माची जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत का, ही खरी कसोटी असली पाहिजे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
धर्म समजून घेऊन तो आचरणात आणानैतिकता असा प्रश्न विचारते की, माझ्या आचरणाने नैतिक व्यवस्था टिकवून ठेवली आहे की तिचे नुकसान केले आहे? आपले कर्म योग्य ठरवण्यासाठी आपण किती तर्क देऊ शकतो ही धर्माची कसोटी नाही, तर आपण आपल्या कर्माची जबाबदारी स्वीकारतो का, ही आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

बिहारमध्ये दारोगा भरतीची मुख्य परीक्षा रद्द; संतप्त उमेदवार रस्त्यावर उतरले!
मुंबईत ‘ज्ञानेश कुमार हटाओ’ मार्च; आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला जनसागर!
नंदुरबारमध्ये दुष्काळाचा मोठा फटका; २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची पालकमंत्र्यांची माहिती!
देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel




