पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 17 तारखेला दुपारी 2.15 वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर, दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. दुपारी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6.30 वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, व्हीव्हीआयपी नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत. उद्या कोणते मार्ग बंद राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण मुंबईतील हे मार्ग राहतील बंद
- छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक बंद असणार आहे, फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल.
- नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतूकीसाठी बंद असणार आहे.
- रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे.
- पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात येईल. अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे उद्या बंद राहणार आहे.
दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बदल लागू राहणार
गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित भारत–फ्रान्स ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ कार्यक्रमाच्या (14 ते 22 फेब्रुवारी 2026; मुख्य कार्यक्रम 17 फेब्रुवारी) पार्श्वभूमीवर लगतच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या या बदलांची नोंद घेण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

