
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माने यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून आरोपीला अटक केली.
रिझवान अस्लम खान (वय २४, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माने हे पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांना २३ जानेवारी रोजी फेसबुकद्वारे अनोळखी तरूणीचे मेसेज आले होते. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
३१ जानेवारीला फेसबुकवर व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यांना संशय आला. परंतु त्यांना सतत आठवडाभर मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी रात्री दहाच्या सुमारास तो व्हिडिओ कॉल उचलला. काही सेंकदांसाठी तो कॉल सुरू राहिला. आरोपींनी माने यांच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून कॉल करुन भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल माने यांना पाठविला. तसेच, एक लाख रुपये खंडणी न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत माने यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी रिझवान खान याला राजस्थानच्या भरतपूर येथून अटक केली. आरोपीच्या मोबाईलमध्ये ९० अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यास सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सेक्सस्टॉर्शनचा प्रकार ऐकून होतो. पण, मी या धमक्यांना बळी न पडण्याचे ठरवले. तरुणांना ब्लॅकमेल करून लुटले जात असून, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हा प्रकार खूपच भयानक आहे. पुणे पोलिसांचे मी आभार मानतो. अनवधानाने असा प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



