दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘केजीएफ’ स्टार, कन्नड अभिनेता यश यामध्ये मुख्य भूमिका साकारतोय. या कन्नड-इंग्रजी चित्रपटाच्या कथेबद्दल फार काही सांगितलं गेलं नाही. परंतु आतापर्यंत प्रमोशनच्या निमित्ताने जे काही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं, त्यावरून हा पीरिअड गँगस्टर ड्रामा असल्याचं कळतंय. आता या चित्रपटाचे युएईमधील डिस्ट्रीब्युटर ‘फार्स फिल्म्स’ने त्यांच्या वेबसाइटवर कथेबाबत बरीच माहिती दिली आहे. यातून या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
काय आहे ‘टॉक्सिक’ची कथा?
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची कथा गोव्यातील 1940 पासून ते 1970 च्या दशकादरम्यान घडते. टॉक्सिक हा अत्यंत क्रूर अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. गोव्यात त्याकाळी वसाहतवाद कमी झाला आणि गँगस्टर गँग उदयास आले. अशातच एक माणूस विश्वासघात, भीती, रक्तपात यांच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं करतो. ‘सत्ता दिली जात नाही, ती घेतली जाते आणि त्याची नेहमीच परतफेड करावी लागते. तस्करीचे मार्ग युद्धभूमी बनतात आणि निष्ठा संशयात बदलते’, अशा काही ओळी इथं अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या चित्रपटाला 18+ रेटिंग देण्यात आली आहे.
टॉक्सिक या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं असून व्यंकट के. नारायण आणि यश यांनी त्यांच्या ‘केव्हीएन प्रॉडक्शन्स’ आणि ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशच्या करिअरमधील हा 19 वा चित्रपट असून ‘केजीएफ’च्या सीरिजनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचं शूटिंग इंग्रजी आणि कन्नड भाषेत एकाच वेळी पार पडलंय. परंतु इतर दाक्षिणात्य भाषा आणि हिंदीतही तो प्रदर्शित होणार आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच तारखेला रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


