फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
AI India Summit: देशाची राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित India AI Impact Summit 2026 मध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींनी या मंचावर AI च्या भविष्यावर त्यांचे मत मांडले. कार्यक्रमात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. यासह त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्दाकडे लक्ष वेधले. 15 वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियावर रोख लावावी, प्रतिबंध घालावा असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
India AI Impact Summit 2026 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी भाषणाची सुरुवात नमस्ते म्हणून केली. या शानदार शहरात, या शानदार शहरात माझे स्वागत करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या कृत्रिम बुद्धिमत्ता संमेलनात येऊन फार चांगलं वाटतं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
10 वर्षांत बरचं काही बदलले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की गेल्या 10 वर्षांत बरचं काही बदलले आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईत एक स्ट्रीट व्हेंडर साधं बँक खातं उघडू शकत नव्हता. त्याच्याकडे स्वतःचा पत्ता नव्हता. कोणतेही कागदपत्र नव्हते. पण आज येथील वातावरणच नाही तर व्यवस्था बदलली आहे. आज तोच विक्रेता त्याच्या मोबाईलवर पेमेंट स्वीकारू शकतो. हा मोठा बदल आहे. भारत प्रत्येक वर्षी लाखो AI अभियंत्यांना प्रशिक्षण देतो. 500,000 एआय अभियंत्यांसह भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा समुदाय असल्याचे मॅक्रॉन म्हणाले.
लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घाला
इंडिया एआय समिट दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना एक मोठे आवाहन केले आहे. त्यांनी 15 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याचे आवाहन केले. मॅक्रॉन यांनी सांगितले की फ्रान्समध्ये 15 वर्षांच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आहे. त्यांना सोशल मीडिया वापरता येत नाही. आम्ही या रस्त्यावर पुढे निघालो आहोत. मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा याच रस्त्यावर पुढे जातील.
जगात भारताची वेगळी ओळख
भारताने जे काही केले आहे ते जगावेगळं आहे. इतर देश ते करू शकला नाही. 1.4 अब्ज लोकांसाठी एक डिजिटल ओळख इथंच तयार करण्यात आलेली आहे. एक पेमेंट सिस्टिम ज्यामुळे दर महिन्याला 20 अब्ज व्यवहार प्रक्रिया होते. एक आरोग्य व्यवस्था उभारली ज्यात 500 दशलक्ष डिजिटल हेल्थ ID देण्यात आले आहेत, असे इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




