पुणे : जहाँगीर, संचेती, के.ई.एम. या रुग्णालयामध्ये अनियमितता आढळून आल्याचे निरीक्षण धर्मादाय खाजगी रूग्णालयाची तपासणी करून सरकारला शिफारस करण्यासाठी नेमलेल्या तदर्थ संयुक्त समितीने (२०२०-२१) नोंदवले आहे. याबाबतचा अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.
मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना सरकारतर्फे सवलत देण्यात येते. यामध्ये शुश्रुषालय,प्रसूतिगृह दवाखाने, वैद्यकीय सहाय्यासाठीचे केंद्र यांचा समावेश होतो. ही समिती सरकारकडून देणारी सवलत, आर्थिक व दुर्बल घटकांना राखीव ठेवलेले अधिकार याची तपासणी करून सरकारला शिफारशी करण्यासाठी स्थापन केलेली आहे.
या समितीने ४ व ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुणे येथे धर्मादाय रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर समितीच्या एकूण तीन बैठका झाल्या. त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी झालेल्या अंतिम बैठकीत प्रारूप अहवाल विचारात घेऊन तो संमत केला आहे. या समितीचे प्रमुख विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे आहेत. दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय आमदार या समितीचे सदस्य आहेत.
समितीने पुणे जिल्ह्यातील जहाँगीर, रूबी, दीनानाथ मंगेशकर, सह्याद्री, संचेती, के. ई. एम, इनलॅक्सअँड बुधराणी या धर्मादाय खाजगी रुग्णालयांना भेटी दिल्या. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत उपचार होतो, असा फलक आढळला नाही. हा फलक रुग्णालयाच्या बाहेरच्या बाजूला छोट्या आकारात लावण्यात आला होता. हा फलक प्रतिक्षाकक्षात लावणे आवश्यक असताना तसा लावला नाही. याचबरोबर रूग्ण आय.पी.एफ.चा किंवा इ.डब्ल्यू.एस.चा असल्याची माहिती तसेच त्याचे नाव फलकावर लावणे. तसेच अशा रूग्णाकडून कोणतीही अनामत घेऊ नये, अशी सूचना समितीने केली.
दर्शनी भागात फलक नाही
- समितीने रूबी रूग्णालयातील रुग्णांशी चर्चा केली. यावेळी एका रूग्णाकडे केशरी रंगाचे रेशनकार्ड असल्यामुळे त्याच्यावर मोफत उपचार करावेत, असे पत्र दिले होते तरी या रुग्णाला दाखल केले नाही. तसेच या रुग्णांच्या नातेवाईकांकडून १० हजार अनामत रक्कम घेतली, असे आढळले.
- समितीने संचेती, सह्याद्री रुग्णालयांना भेटी दिल्या. या दोन्ही ठिकाणी आर्थिक व दुर्बल घटकांबाबतचे फलक दर्शनी भागात लावले नव्हते.
- आयपीएफ व ईडब्ल्युएस या वर्गातील रुग्णांच्या खाटा किती, किती रूग्णांवर उपचार सुरू आहेत,याची माहिती के. ई.एम.रुग्णालयाला समितीला सांगता आले नाही.
- आर्थिक व दुर्बल घटकातील रूग्णांबाबत भेदभाव न करता सर्वांवर सारखाच उपचार झाला पाहिजे.
- उपचार करताना हलगर्जी झाली आणि तशी तक्रार आली तर संबंधितांवर कडक कारवाई करावी.
- प्रत्येक रूग्णालयात आय.पी.एफ.चे खाते उघडून २ टक्के रक्कम भरणा करावी. त्याचा तपशील प्रत्येक धर्मादाय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तपासावा. कारवाईची माहिती समितीला तीन महिन्यांत पाठवावी.
हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




