
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सध्या शहरात पाहायला मिळत आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी आजचा दिवस सुपर संडे ठरला आहे. भाजपाचे नाना काटे, बंडखोर राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला, तर अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मध्यवरती प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. भाजपाचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज शहरात होते.
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. अगोदर ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना आता तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राहुल कलाटे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. तसेच, महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला. तर, भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मध्यवरती प्रचार कार्यालयाच्या उदघाटन भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून बंडखोर राहुल कलाटे यांच्यासह भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच उमेदवार धावपळ करत आहेत. त्यामुळे आजचा रविवार हा उमेदवारांसाठी सुपर संडे ठरला हे मात्र खरं आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या अन बंडखोर राहुल कलाटे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटला. तर भाजपच्या अश्विनी जगतापांच्या प्रचार कार्यालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी शुभारंभ केला. आज रविवार असल्यानं या तिन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. भाजपने सहानुभूतीसह विकासाचा मुद्दा लाऊन धरणार असल्याचं स्पष्ट केलं. तर महाविकासआघाडी आणि बंडखोर कलाटे यांनी सहानुभूतीची लाट नसल्यानं भाजपचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू अन आमची विकासाची दिशा जनतेला पटवून देऊ अन विजय मिळवू. असा विश्वास व्यक्त केला आहे.
शहर
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- कूनोच्या जंगलात चित्ता गावात शिरला तर काय करावे? 'चीता मित्रां'नी राष्ट्रपतींना सांगितली संरक्षणाची गुरुकिल्ली!
- जनतेच्या आस्थेशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही! राम मंदिर दान चोरी प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक.
- पनवेल हादरले! अंगणवाडीत जाण्यास नकार दिल्याने चिमुकलीला आईची अमानवीय मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच संताप!
महाराष्ट्र
- मुंबई लोकल: महिलांच्या सुरक्षेसाठी लावलेले 'टॉकबॅक' सिस्टीमच बंद; रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
- कूनोच्या जंगलात चित्ता गावात शिरला तर काय करावे? 'चीता मित्रां'नी राष्ट्रपतींना सांगितली संरक्षणाची गुरुकिल्ली!
- खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम! उपचारांचे दर ठरवणार सरकार, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा.
- जनतेच्या आस्थेशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही! राम मंदिर दान चोरी प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक.
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.



























Subscribe to my channel



