महापालिकेच्या निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे दिलेले आश्वासन असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरांचे कर्ज सुरू, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आणि डोक्यावर कारवाईची टांगती तलवार; यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे.
65 इमारतींचा वाद पेटला
कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्याशी संबंधित 65 इमारतींपैकी डोंबिवली आयरेगाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीला पुन्हा एकदा पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.जागामालकाच्या वादातून न्यायालयाने संबंधित इमारत निष्काशीत करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश
समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीतील रहिवाशांना सहा तारखेपूर्वी घरे रिकामी करण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. मात्र, मागील वर्षभर सुरू असलेल्या या वादात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी इमारतींवर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. तरीही पुन्हा नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. समर्थ कॉम्प्लेक्समधील अनेक कुटुंबांनी आयुष्याची जमापुंजी या घरात गुंतवली आहे. बहुतांश घरांवर बँकेचे कर्ज सुरू असून, परीक्षांचा कालावधी असल्यामुळे विद्यार्थ्यांवरही मानसिक ताण वाढला आहे.
आत्महत्येशिवाय पर्याय नाही…
पालिकेकडून नोटीस आल्यानंतर रहिवासी महिलांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आम्ही घर घेऊन चूक केली का? जर कारवाई करणार असाल, तर आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही’ असा टाहो महिलांनी फोडला. दरम्यान, सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले की ही इमारत 65 इमारतींच्याच यादीतील असून न्यायालयीन आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. आता या प्रकरणात सरकार, राजकीय नेते, पालिका प्रशासन आणि न्यायालय यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य

























Subscribe to my channel




